Sunday, August 31, 2025

बोरीवलीत इमारतीला आग, काही लोक अडकल्याची भीती

बोरीवलीत इमारतीला आग, काही लोक अडकल्याची भीती

मुंबई : बोरिवली पश्चिमेकडील चिकूवाडीमध्ये एका इमारतीला भीषण आग लागली आहे. दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटाच्या सुमारास पॅरेडाइज इमारतीच्या बाराव्या मजल्यावर आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून सध्या युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत.

इमारतींमधील बहुतांश लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. ही २४ मजली इमारत असून काही लोक अडकले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

Comments
Add Comment