
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेले राऊतांचे आरोप मोहित कम्बोज यांनी कालच फेटाळून लावले. त्यानंतर ट्विट करत कम्बोज यांनी राऊतांना पैसे दिल्याचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. तसेच ओळखत नाही म्हणणा-या संजय राऊत यांचा स्वत:च्या घरात सत्कार करतानाचा राऊत यांच्यासमवेतचा एक फोटोही शेअर केला आहे.
राऊत यांनी पत्रकार परिषदेच्या शेवटच्या क्षणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले. फडणवीस यांचा एक फ्रंटमॅन आहे, मोहित कम्बोज, मी त्याला ओळखत नाही. या कम्बोज यांनी पीएमसी बँकेतील घोटाळ्याचे पैसे जमिनी खरेदी, प्रकल्प उभारण्यासाठी वापरल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. तसेच हा कम्बोज एकदिवस देवेंद्र फडणवीसांना बुडविणार असल्याचंही ते म्हणाले. संजय राऊत यांच्या या आरोपावर मोहित कम्बोजने सडेतोड उत्तर दिले आहे.
https://twitter.com/mohitbharatiya_/status/1493618022635896834
संजय राऊत हे मला ओळखत नाहीत, असे म्हणतात. तरीही दरवर्षी गणेश उत्सवात माझ्या घरी येतात. अनेकदा मी गरज भासल्यास त्यांना पैसेही दिले आहेत, असे मोहित कम्बोज यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/mohitbharatiya_/status/1493611311476973574
अनोळखी माणसाकडून संजय राऊत यांनी २५ लाख रुपये मदत घेतली. सन २०१४ मध्ये रॉयल मराठा एंटरटेनमेंट कंपनीच्या नावाने हे पैसे घेतले आहेत. आता, तुमचे सत्य सगळ्यांना सांगणार, पूर्णपणे बेईज्जत करणार संजय राऊत तुम्हाला... अशा शब्दात मोहित कम्बोज यांनी ट्विट करुन राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, तत्पूर्वी कम्बोज यांनी ट्विट करुन राऊतांच्या प्रश्नावर प्रत्युत्तर दिले होते. करारा जबाव मिलेगा.... असे म्हणत आपण संजय राऊत यांच्या बिनबुडाच्या आरोपावर पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार, त्यांनी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्यावर पलटवार केला.
https://twitter.com/mohitbharatiya_/status/1493574281321615360
https://twitter.com/mohitbharatiya_/status/1493569903458013184
https://twitter.com/mohitbharatiya_/status/1493548881543450625