Friday, March 21, 2025
Homeताज्या घडामोडीमुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने सहा वाहनांचा विचित्र अपघात; चौघे...

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने सहा वाहनांचा विचित्र अपघात; चौघे जागीच ठार

खोपोली : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळ बोरघाटात आज (मंगळवार) भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये चार जण जागीच ठार झाले असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर एम. जी. एम. रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेसहाच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झालाय. एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने सहा ते सात वाहने एकमेकांना धडकली. यात ट्रक आणि टेम्पोच्या दरम्यान आल्याने कारचा चुराडा झाला. या भीषण अपघातामध्ये दोन मोठ्या वाहनांच्यादरम्यान चिरडल्या गेलेल्या कारमधील चौघेही जागीच ठार झालेत.

ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने पाच वाहनांचा अपघात घडला. पाच वाहनांचा अपघातात कंटेनरने पुढे जाणा-या स्वीफ्ट कारला धडक दिली. स्वीफ्ट कार तिच्या पुढे जणाऱ्या आयशर टेम्पोला मागून धडकली. टेम्पोने तिच्या पुढील वेन्यू कारला जोरदार धडक दिली. या अपघातात स्वीफ्टमधील चारही प्रवासी जागीच ठार झाले तर टेम्पोने धडक दिलेल्या कारमधील तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले. टेम्पोची धडक बसलेल्या वेन्यू कारने पुढे जाणा-या कंटेनरला जोरदार धडक दिली. मात्र हा कंटेनर पुढे निघून गेला.

या अपघातात गौरव खरात (३६), सौरभ तुळसे (३२), सिद्धार्थ राजगुरू (३१) यांचा मृत्यू झाला असून एकाची ओळख अद्याप पटलेली नाही.

महामार्ग पोलीस, डेल्टा फोर्स, देवदूत यंत्रणा अपघातग्रास्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. या तिन्ही संस्थेच्या सदस्यांनी वेगाने मदतकार्य करत अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरुन बाजूला केली. सध्या या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -