
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेली पत्रकार परिषद ही खोदा पहाड निकला छोटा... चुहा अशी होती, असा टोला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे. भाजप मोठा पक्ष आहे. शिवसेनेच्या महाराष्ट्रात फक्त ५६ जागा आहेत. यापूर्वी कलमाडी, ए राजा यांच्यावरही ईडीने कारवाई केली होती. त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते. तपास यंत्रणांचा आताच दबाव वाटतो का? असा प्रश्नही त्यांनी राऊतांना विचारला आहे.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सुधीर मुनगंटीवार यांच्यावरही गंभीर आरोप केले. यावर आता सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. राऊत यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही, आज ते कुठलेही पुरावे देऊ शकले नाहीत. आमची कितीही चौकशी केली तरी काहीही निघणार नाही. ज्या बाळासाहेबांना भुजबळांनी आत टाकले त्यांच्या मांडीला मांडी लावून हे सत्तेत आहेत; असा गंभीर आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर केला आहे.