Tuesday, April 29, 2025
Homeदेश'संसद टीव्ही'च्या यु-ट्यूब वाहिनीवर सायबर हल्ला

‘संसद टीव्ही’च्या यु-ट्यूब वाहिनीवर सायबर हल्ला

नवी दिल्ली (हिं.स) : ‘संसद टीव्ही’ ची यु-ट्यूब वाहिनीवर काही तत्वांद्वारे १५ फेब्रुवारी मंगळवारी रात्री एकच्या सुमारास सायबर हल्याने बाधित झाली. संसद टीव्हीने या संदर्भात अधिकृत माहिती देत स्पष्ट केले आहे की, यु-ट्यूब संस्था या विषयाचा तपास करीत असून सर्व प्रश्न लवकरच सुटतील आणि बाधित यु-ट्यूब वाहिनी पूर्ववत होईल.

सायबर हल्याने ‘संसद टीव्ही’ ची यु-ट्यूब वाहिनी आणि थेट डिजिटल प्रक्षेपण सेवा बंद झाली होती. मात्र ‘संसद टीव्ही’ चे इतर अधिकृत सामाजिक माध्यम- डिजिटल संवाद वाहिन्या कायम आहेत. यापूर्वी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्वीटरमध्ये काही समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यानंतर ते पूर्ववत करण्यात आले. मागील वर्षी राज्यसभा आणि लोकसभा वाहिन्यांचे विलीनीकरण होऊन ‘ संसद टीव्ही ‘ १५ सप्टेंबर पासून अधिकृतपणे सुरु झाले. डिजिटल माध्यमांच्या वाढत्या गर्दी आणि गोंधळात राज्यसभा आणि लोकसभा वाहिन्यांचे कार्यक्रम आणि विविध विषयांवर असलेल्या अभ्यासपूर्ण सादरीकरणास नागरिकांचा गेल्या काही वर्षांपासून विशेषतः सामाजिक माध्यमांवर मोठा प्रतिसाद लाभतो आहे. संसद टीव्हीने सामाजिक माध्यमांवर पदार्पण केले असून अधिकृत डिजिटल वाहिन्यांची यादी प्रदर्शित करण्यात आली आहे. नागरिक ‘ संसद टीव्ही ‘ संबंधी सर्व माहिती आणि मजकूर खालील सामाजिक माध्यमांवर बघू शकतील.

Twitter https://twitter.com/sansad_tv

Instagram http:nstagram.com/sansad.tv/

FB https://www.facebook.com/SansadTelevision/

Koo https://www.kooapp.com/profile/Sansad_TV

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -