Monday, July 22, 2024
Homeसाप्ताहिककोलाजदर्जा व्यवस्थापन : मानके आणि साधने

दर्जा व्यवस्थापन : मानके आणि साधने

कोकणी बाणा : सतीश पाटणकर

क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल रिक्रुटमेंट बोर्ड फॉर अँड ट्रेनिंग, कन्सल्टन्सी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, नॅशनल प्रॉटडक्टिविटी कौन्सिल स्टँडर्डायझेशन टेस्टिंग सर्टिफिकेशन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यासारख्या तज्ञ संस्था दर्जा व्यवस्थापन आणि दर्जा तंत्रज्ञान साधनाच्या क्षेत्रात रस असलेल्या औद्योगिक संघटना, तंत्रज्ञान संस्था, इंजिनिअरिंग कॉलेजेस, टूल रुम्स आणि तत्सम संस्था तसेच लघू आणि मध्यम उद्योग या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

तंत्रज्ञान संस्थांमध्ये पूरक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे, तज्ञ संस्था अथवा औद्योगिक संघटनांना दर्जा व्यवस्थापन मानका संदर्भात जनजागृती करण्यासाठी कार्यशाळा घेण्यासाठी निधी देणे, कॉम्पिटिशन वॉच आयोजित करण्यासाठी किंवा अभ्यासासाठी तसेच पडताळणी साठी निधी उपलब्ध करून देणे, तरी या संस्था अथवा औद्योगिक संघटना निवडक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग यामध्ये दर्जा व्यवस्थापन मानके अथवा दर्जा तंत्रज्ञान साधनांचा अवलंब करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे, पाहणी व सल्ला समितीने निवडलेल्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग घटकांना आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यात सहभागी करून मिळणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

आधुनिक काळात माणसाच्या आशाआकांक्षा विलक्षण वाढल्या आहेत. त्यांची पूर्ती करण्यासाठी अभूतपूर्व स्वरूपाचे सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. एकट्या-दुकट्या व्यक्तीला हे कार्य जमणारच नाही. जेव्हा एखाद्या सर्वसामान्य उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी व्यक्ती एकत्र येतात. परस्परांशी सहकार्य करतात आणि वेळ, संपत्ती व श्रम यांचा कमीत कमी वापर करून सुकरतेने उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यासर्व घडामोडींचे व्यवस्थापन करणे आवश्यक ठरते. सर्वसामान्य उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी व्यक्तींचा एखादा गट जेव्हा कार्यरत होतो तेव्हा कोणीतरी त्या त्या गटाचा प्रमुख किंवा नेता होतो व त्या गटाच्या कार्याचे व्यवस्थापन करू लागतो. ठरविलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी करावयाचे एकूण कार्य तो निश्चित करतो व त्या कामाची विविध प्रकारच्या कृती आणि हालचालींमध्ये विभागणी करतो. हे करीत असताना त्याला त्याच्या नाचा, अनुभवाचा आधार घ्यावा लागतो, आणि त्याच्या व इतरांच्या सोयींचाविचार करावा लागतो. नंतर तो विविध कृती व हालचालींचे अनेक प्रकारच्या निश्चित कामांमध्ये वर्गीकरण करतो आणि ती कामे निरनिराळ्या व्यक्तीकडे, त्यांच्या गटांकडे कुवतीनुसार सोपवतो.

दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास तो समूह-नेता त्याच्या समूह हालचालींचे संघटन करतो आणि समूहातील व्यक्ती व त्यांची कामे यांचे संबंध निश्चित करतो. तसेच तो समूहातील व्यक्तींच्या विविध कृतींमध्ये सुसंवाद साधतो. त्या कृतींना योग्य ती दिशा देतो व त्यांचे नियंत्रणही करतो. समूहाचे काम सहकार्याने व सुरळितपणेचालले आहे असे तो पाहतो. म्हणजेच तो त्या समूह-कार्याचे व्यवस्थापन करतो. थोडक्यात,समान उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी एकत्र आलेल्या व्यक्ति समूहाच्या कामाची जेव्हा एखादी व्यक्तीविशिष्ट व्यवस्था करते व ती व्यवस्था नीट राबविली जाते की नाही हे पाहाते तेव्हा ती व्यक्ती व्यवस्थापक म्हणून काम करते असे म्हणता येईल.

दर्जा व्यवस्थापन कंपनीमध्ये त्याच्या क्रियांच्या चांगल्या अंमलबजावणीची हमी देण्यासाठी केलेल्या सर्व प्रक्रिया आहेत.या सर्व प्रक्रिया आणि पद्धती एकल संरचनेत विभागली जातात ज्याला म्हणतात गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली, जे संस्थेच्या प्रकारानुसार, ते कोणत्या क्षेत्रात समर्पित आहे आणि त्याच्या उद्दीष्टांवर अवलंबून असते.जेव्हा गुणवत्ता व्यवस्थापन विशिष्ट निकषांची पूर्तता करते, तेव्हा ते त्यास ओळखले जाऊ शकते आयएसओ मानक, जे हे प्रमाणित करते की संस्थेद्वारे पद्धतशीरपणे लागू केलेल्या प्रक्रिया औद्योगिक सुरक्षा, आरोग्य आणि उत्पादन प्रक्रियेच्या सर्वोच्च मापदंडांसह उत्पादनांमध्ये आणि सेवांमध्ये अनुवादित केल्या जातात. गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली एक प्रकारची मार्गदर्शक आहे जी संस्थेची प्रक्रिया, कार्यपद्धती, रचना, आर्थिक, तांत्रिक आणि मानव संसाधनांचे तपशीलवार वर्णन करते.

सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांना अद्ययावत दर्जा व्यवस्थापन मानके आणि दर्जा तंत्रज्ञान साधना विषयी माहिती देणे तसेच त्याचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे हा योजनेचा प्रमुख उद्देश आहे. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग घटक उद्योग किंवा समूह एम. एस. एम. विकास आयुक्तलयाशी संपर्क साधू शकतात. या कार्यालयातर्फे दर्जा व्यवस्थापन मानके आणि दर्जा तंत्रज्ञान साधने विषयीच्या जागरूकता कार्यक्रमाविषयी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग घटक अथवा समूहाची निवड केली जाते.

(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -