मोनालीसा म्हणते, ‘का रं देवा’

  97

मनोरंजन : सुनील सकपाळ


अनेक चित्रपटांसोबतच मालिकांमध्येही दिसलेली गोड चेहऱ्याची अभिनेत्री मोनालीसा बागल ही ‘का रं देवा’ चित्रपटात पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत आहे. सह्याद्री फिल्म प्रॉडक्शनच्या प्रशांत शिंगटे निर्मित व रंजीत सावंत दिग्दर्शित ‘का रं देवा’ या आगामी सिनेमामध्ये तिची जोडी मयूर लाडसोबत जमली आहे. हा चित्रपट ११ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. या अनोख्या प्रेमकथेच्या निमित्तानं मोनालीसा हिच्यासोबतची बातचीत.


‘का रं देवा’सोबतच्या प्रोसेसबद्दल काय सांगशील?


पहिल्या लाॅकडाऊनच्या काळात माझ्याकडे ‘का रं देवा’ची स्क्रिप्ट आली. दिग्दर्शक रंजीत सावंत यांच्या म्हणण्यानुसार या चित्रपटात नायिका साकारण्यासाठी थोडं वजन वाढवणं गरजेचं होतं. माझ्यासाठी ते थोडंसं अवघड काम होतं. कारण त्याच वेळी मी आणखी एका सिनेमात काम करत होते. त्याचे शूटिंग कोल्हापूरमध्ये सुरू होते. त्याच दरम्यान या चित्रपटाचीही बोलणी सुरू होती. वजन वाढवण्यासाठी माझ्याकडे केवळ १५ दिवसांचा अवधी होता. खूप प्रयत्नांती मी माझं वजन वाढवण्यात यशस्वी झाले. सात किलो वजन वाढवलं.


व्यक्तिरेखेसाठी वजन वाढवणं का गरजेचं होतं?


या सिनेमामध्ये मी साकारलेली जानू ही ‘स्लिम अँड ट्रिम’ नसावी असं दिग्दर्शकांचं म्हणणं होतं. ते कॅरेक्टर छबी टाइपचं असायला हवं, असं त्यांना वाटत होतं. त्यासाठी वजन वाढवावं लागलं. ‘का रं देवा’ सिनेमातील माझी भूमिका खूप यूथफुल असून, आजच्या तरुणाईचं प्रतिनिधित्व करणारी आहे. या चित्रपटात टीनेज लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे.


‘जानू’ कॅरेक्टरमधली कोणती गोष्ट भावली?


मी रिअल लाइफमध्ये आहे. तसंच कॅरेक्टर मला पडद्यावर सादर करायचं होतं. ही या चित्रपटातील कॅरेक्टरमधली गोष्ट मला खूप भावली. मला खूप काही विशेष वेगळेपण दाखवण्याची गरज नव्हती. मी जशी आहे, तशीच लोकांसमोरही येते. मला भपकेबाजपणा दाखवायला आवडत नाही. दाखवायचं वेगळं आणि असायचं वेगळं हे मला पटत नाही. कोणाला तरी आपल्या वागण्यामुळं आनंद होतोय म्हणून ती गोष्ट मी कधीच केली नाही. त्यामुळं मला हे कॅरेक्टर करताना खूप मजा आली. प्रामाणिकपणा हा या कॅरेक्टरमधील गुण मला विशेष अॅट्रॅक्ट करणारा ठरला आणि जानूमधील हाच गुण प्रेक्षकांचंही लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसा ठरेल.


चित्रपट स्वीकारण्यामागं काही विशेष कारण?


माझ्या आयुष्यात असे काही प्रसंग घडले आहेत किंवा काही घटना घडल्या त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टी या चित्रपटात असल्याचं मला जाणवलं. त्यामुळं हा चित्रपट स्वीकारला.


या लव्हस्टोरीतील नावीन्य काय?


सध्या मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या ज्यॉनर्सचे चित्रपट येत आहेत. त्याच वाटेनं जाणारा हा चित्रपट आहे. यातही बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी प्रेक्षकांना अनुभवायला मिळतील. ज्यावेळी मी ‘मैंने प्यार किया’ हा चित्रपट पाहिला होता, तेव्हा भविष्यात आर्टिस्ट होईन असं कधीच वाटलं नव्हतं. मला ती फिल्म खूप आवडायची. एक लव्हस्टोरी असावी, तर अशी असावी असं मला कायम वाटायचं. फक्त लव्हस्टोरी नसून, त्यात मसालाही खूप आहे. ‘का रं देवा’मधील मयूरसोबतची माझी लव्हस्टोरीही खूप वेगळी आणि प्रेक्षकांना बरंच काही देणारी असल्यानं त्यांना बघायला खूप मजा येईल.


मयूर आणि इतर सहकाऱ्यांसोबतच्या अनुभवाबाबत काय सांगशील?


अरुण नलावडे सरांनी या चित्रपटात माझ्या वडिलांचा रोल केला आहे. ‘ड्राय डे’ चित्रपटातही त्यांनी माझ्या बाबांची भूमिका साकारली होती. दुसऱ्यांदा दोघेही ऑनस्क्रीन बाप-लेकीच्या भूमिकेत आहोत. पहिलाच चित्रपट असला तरी मयूर हा तयारीचा कलाकार आहे. सुरुवातीला आमची ओळख नसल्यानं थोडे नर्व्हस होतो. पण नंतर आमची मैत्री झाल्यानं काम करणं खूप सोपं गेलं. लव्हस्टोरी असल्यानं आमचं छान ट्युनिंग जुळणं आणि केमिस्ट्री पडद्यावर दिसणं खूप महत्त्वाचं होतं. ऑफस्क्रीन आमच्यात चांगली गट्टी जमल्यानं काम करणं सोपं गेलं. आम्ही दोघांच्या सीनबद्दल चर्चा करायचो आणि ते कसे इम्प्रूव्ह होतील, याकडे लक्ष द्यायचो.

Comments
Add Comment

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 'येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न...

मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच

डोळे सुजलेल्या अवस्थेत चिन्मयी सुमितने सांगितलं हिंदी सक्ती विरोधात सहभागी न होण्याचं कारण..

हिंदी भाषा सक्तीचा जीआर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काढला. या जीआरनुसार मराठी भाषा इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत

झी टॉकीजचा अनोखा उपक्रम..विठोबा रखुमाईसाठी हाताने विणले जात आहे वस्त्र..

झी टॉकीजचा 'हँडलूम कॅन्टर' यंदाच्या वारीत सज्ज झाला आहे. सध्या फलटण फाट्याजवळ विठोबासाठी भक्तीचं वस्त्र विणलं

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची झी मराठीच्या 'कमळी' मालिकेत एन्ट्री

मुंबई : अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने तिच्या अभिनय

Phir Hera Pheri 3 : ये बाबुराव का स्टाइल है... अखेर ‘बाबू भैय्या’चं 'Phir Hera Pheri 3' मध्ये दणक्यात पुनरागमन!

अक्षय कुमार-प्रियदर्शन बरोबरच्या वादावर पडदा मुंबई : परेश रावल यांनी हेरा फेरी ३ चा वाद संपुष्टात आणत या

भारतीय रेल्वे अपघातांवर अभिनेते मिलिंद गवळींची उद्विग्न प्रतिक्रिया: "पाकिस्तान-बांग्लादेशपेक्षा बरी, पण..."

मुंबई: लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी यांनी मुंबईतील वाढत्या रेल्वे अपघातांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सोशल