Tuesday, December 10, 2024
Homeताज्या घडामोडीउपनगरी रेल्वे प्रवाशांना मिळणार निःशुल्क डेटा कनेक्टिविटीचे लाभ

उपनगरी रेल्वे प्रवाशांना मिळणार निःशुल्क डेटा कनेक्टिविटीचे लाभ

मुंबई : आता उपनगरी रेल्वेमधून (मध्य रेल्वे) प्रवास करताना, सेल्युलर नेटवर्क अनियमित असताना किंवा अजिबात उपलब्ध नसताना देखील माहिती, मनोरंजन, खरेदी, शिक्षण, कौशल्यवृद्धी सेवा, पेमेंट प्लॅटफॉर्म्स या व अशा अनेक डिजिटल सेवासुविधांचा अखंडित अनुभव घेता येईल.

आजपासून मध्य रेल्वेच्या प्रवाशांना त्यांच्या संपूर्ण रेल्वे प्रवासात मागणीप्रमाणे, संबंधित डिजिटल ऍप्सचा उपयोग करता येईल. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी शुगरबॉक्स नेटवर्क्सचे सह-संस्थापक रोहित परांजपे, रिपुंजय बारारिया व देवांग गोराडिया व मुंबई डिव्हिजनचे डीआरएम शालभ गोयल यांच्या समवेत एका पत्रकार परिषदेत घोषणा करून या सेवांचा शुभारंभ केला. यावेळी त्यांचे इतर सहकारी अधिकारी देखील उपस्थित होते.

मध्य रेल्वे (मुंबई डिव्हिजन) आणि जगातील पहिला हायपरलोकल एज क्लाऊड प्लॅटफॉर्म शुगर नेटवर्क्स शुगरबॉक्स नेटवर्क्स यांनी जगातील एका सर्वात व्यस्त सार्वजनिक वाहतूक नेटवर्कमध्ये डिजिटल उपलब्धतेमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी भागीदारी केली आहे. नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून आपल्या ग्राहकांना प्रदान केल्या जाणाऱ्या अनुभवांमध्ये अधिकाधिक वाढ व सुधारणा करण्याच्या मध्य रेल्वेच्या भविष्यवेधी उद्दिष्टांच्या पूर्ततेमध्ये ही भागीदारी हे एक योगदान ठरणार आहे.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी सांगितले, “मध्य रेल्वे हा मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा आहे. दररोज तब्बल ४५ लाख प्रवासी आमच्या उपनगरी नेटवर्कचा (कोविड-पूर्व काळात) लाभ घेतात. हे प्रवासी रेल्वे प्रवासाला लागणाऱ्या वेळेचा उपयोग आपापल्या डिव्हायसेसवर विविध सेवासुविधांचा लाभ घेण्यासाठी करत असतात. त्यामुळे जर आम्ही आमच्या सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा समावेश करून त्यांना यासाठी अधिक जास्त सक्षम बनवू शकलो तर त्यामुळे भविष्यासाठी सज्ज राहण्याचे व ग्राहककेंद्री धोरण अवलंबिण्याचे आमचे लक्ष्य अधिक बळकट होईल. तंत्रज्ञानाचा वापर करून आमच्या ग्राहककेंद्री धोरणामध्ये अधिकाधिक सुधारणा घडवून आणण्याच्या दिशेने उचलले गेलेले पाऊल म्हणजे शुगरबॉक्ससोबत करण्यात आलेली ही भागीदारी. मला खात्री आहे की, डिजिटल इंडिया अभियानात योगदान देण्याच्या दृष्टीने ही भागीदारी खूप मोलाची ठरेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -