मुंबई : राजभवन येथील नवीन कोनशिलेचे अनावरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील लोकांमध्ये आणि इथल्या मातीत खासियत आहे, त्यामुळे मी पुन्हा पुन्हा येतो असे प्रतिपादन त्यांनी या प्रसंगी केले. गेल्या साडेचार वर्षात १२ वेळा महाराष्ट्रात आलो. आमचा महाराष्ट्र म्हणजे महान राज्य आहे, असेही राष्ट्रपती म्हणाले.
राजभवनाच्या या हॉलच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे उपस्थित होते.