नवी दिल्ली : मुंबईसह दिल्ली, जयपूर, कोलकाता यांसारख्या देशातील अनेक शहरांमध्ये एअरटेलचे नेटवर्क डाउन आहे. एअरटेलची सेवा ठप्प झाल्यामुळे ग्राहकांचा गोंधळ उडाला आहे. सोशल मीडियावर एअरटेलचे नेटवर्क बंद झाल्याच्या तक्रारी यूजर्स सातत्याने करत आहेत. ट्विटरवर #AirtelDown ट्रेंड करत आहे.
https://twitter.com/airtelindia/status/1492021184846008321दिल्ली, मुंबई, नोएडा आणि इतर अनेक ठिकाणी फायबर इंटरनेट, ब्रॉडबँड, तसेच मोबाइल नेटवर्कचे सर्व एअरटेल कनेक्शन बंद आहेत. अनेक वापरकर्त्यांनी ब्रॉडबँडच्या समस्यांबाबतही तक्रार केली आहे. वापरकर्त्यांचा दावा आहे की एअरटेल थँक्स अॅप देखील काम करत नाही.
DownDetector च्या मते, दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, जयपूर आणि कोलकाता सारख्या शहरांमध्ये एअरटेलचे नेटवर्क डाउन आहे.
दरम्यान, एअरटेलने ट्विट करून आउटेजची माहिती मिळाल्याचे सांगितले आहे. कंपनीने म्हटले आहे की, आमच्या इंटरनेट सेवांमध्ये थोडासा व्यत्यय आला आणि यामुळे तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आता आमची सेवा सुरळीत झाली आहे. आमचे कर्मचारी आमच्या ग्राहकांना अखंड अनुभव देण्यासाठी काम करत आहेत.