नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासात देशात ५८ हजार ७७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कालच्या दिवसाचा विचार केला तर आज १३.४ टक्के कमी रुग्णांची नोंद झाली आहे.
भारतात हळूहळू रुग्णसंख्या वाढीचा वेग कमी होत आहे. काल देशात 67 हजार 84 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर 1 हजार 241 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यामानाने आज रुग्णांच्या संख्येत घट झाली असून, मृत्यूच्या संख्येत देखील घट झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सक्रिया रुग्णांच्या संख्येत देखील घट झाली आहे, सद्या देशात 6 लाख 97 हजार 802 सक्रिय रुग्ण आहेत. तर आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा हा 5 लाख 7 हजार 177 झाला आहे. आत्तापर्यंत देसात 4 कोटी 13 लाख 31 हजार 158 लोक कोरोनातून बरे झाले आहेत.
दरम्यान, देशात सध्या लसीकरण वेगाने सुरू आहे. आत्तापर्यंत देशात 172 कोटी लसीकरणाचे डोस देण्यात आले आहेत. 15 ते 18 वयोगटातील मुलांना देखील लसीकरण वगाने देण्याची प्रक्रिया देशात सुरू आहे. काल दिवसभरात देशात 48 लाख 18 हजार 867 लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत देशात 172 कोटी 79 लाख 51 हजार 432 डोस देण्यात आले आहेत.