चंदीगड : डब्ल्यूडब्ल्यूई सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपली ओळख बनवणारे आणि ‘द ग्रेट खली’ म्हणून लोकप्रिय असलेले दिलीप सिंह राणा यांनी आज, गुरुवारी भाजपात प्रवेश केलाय. पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणाचा भाजप प्रवेश हे पक्षाचे यश मानले जातेय.
दिलीप सिंह राणा याने केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. अलीकडच्या काळात अनेक दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पंजाबी अभिनेत्री माही गिलने या आठवड्याच्या सुरुवातीला भाजपमध्ये प्रवेश केला होता. दलिप सिंग राणा हे आतापर्यंत डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये भारतातील सर्वात मोठे नाव आहे. दलिप सिंग राणाने या खेळात असताना सर्व प्रमुख चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत.
गेल्या काही काळापासून ते डब्ल्यूडब्ल्यूईच्या रिंगणापासून लांब आहेत. भाजप प्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना राणा म्हणाले की, भाजपची धोरणे भारताची प्रगती करण्याची आहेत. पक्षाच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला. भाजपा माझ्यावर जी जबाबदारी देईल ती पूर्ण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.