Friday, May 9, 2025

देशताज्या घडामोडी

रिझव्‍‌र्ह बँकेकडून रेपो दर, व्याजदर जैसे थे

रिझव्‍‌र्ह बँकेकडून रेपो दर, व्याजदर जैसे थे

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने गुरुवारी आपले नवीन पत धोरण जाहीर केले आहे. आरबीआयने व्याजदरात आणि रेपे दरात कोणताही बदल केलेला नाही.


आरबीआयने रेपो दर चार टक्क्यांवर कायम ठेवला आहे. त्याच वेळी, रिव्हर्स रेपो दर देखील ३.३५ टक्क्यांवर राहील. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, समितीने धोरणात्मक दरांमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट (एमएसएफआर) आणि बँक दर ४.२५ टक्के असेल. पत धोरणाचा पवित्रा ‘अनुकूल’ ठेवण्यात आला आहे.


केंद्रीय बँकेने सलग १०व्यांदा व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. एमपीसीच्या सहा पैकी पाच सदस्यांनी व्याजदर कायम ठेवण्याच्या बाजूने मतदान केले. यापूर्वी, रिझर्व्ह बँकेने २२ मे २०२० रोजी अखेरचे व्याजदर बदलले होते.

Comments
Add Comment