नाशिक : भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांच्या अस्थींचे रामकुंडावर धार्मिक विधी करुन त्यांचे विधीवत पध्दतीने विसर्जन करण्यात आले. यावेळी आदिनाथ मंगेशकर, पत्नी कृष्णाबाई मंगेशकर, उषा मंगेशकर, भाचा मयुरेश आदी उपस्थित होते.
नाशिक रामकुंडावर पुरोहित संघातर्फे अस्थी विसर्जनापुर्वी धार्मिक विधी पार पाडले. यावेळी मंगेशकर परिवारासोबत शिवसेना नेते मिलींद नार्वेकर उपस्थित होते. नाशिक शिवसेनेकडून अस्थी विसर्जन कार्यक्रमाचे सर्व नियोजन करण्यात आले होते.
लता दिदींनी ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दादर येथील शिवाजी पार्कवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. दरम्यान, अस्थी विसर्जनासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी होते.