Friday, January 17, 2025
Homeक्रीडाभारतात असतो तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट वाट्याला आले नसते

भारतात असतो तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट वाट्याला आले नसते

एबी डेविलियर्सचे मत

बंगळूरू (वृत्तसंस्था): भारतात असतो तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट वाट्याला आले नसते, असे मत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डेविलियर्सने इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पॉडकास्टमध्ये बोलताना व्यक्त केले.

माझा जन्म भारतात झाला असता तर कदाचित राष्ट्रीय संघात जागा मिळवू शकलो नसतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे माझं स्वप्नच राहिले असते, असं डिव्हिलियर्स म्हणतो. भारतीय संघात आपली जागा निर्माण करणं सोपी गोष्ट नसून यासाठी भारतीय खेळाडूंचा आदर केला पाहिजे असंही मत त्याने मांडलं आहे. भारतीय क्रिकेट संघात एखाद्या खेळाडूला आपलं स्थान निर्माण करण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या देशात राष्ट्रीय संघात जागा मिळवणं खूप मोठं आव्हानच आहे, असे एबीने म्हटले आहे.

गेल्या १५ वर्षांमध्ये आयपीएल क्रिकेट, भारतीय प्रेक्षक आणि भारतीय लोकांच्या काम करण्याची पद्धतीचा मी अनुभव घेतला आहे. भारतात जन्म होणं आणि मोठं होणं थोडं मजेशीर आहे. कोणाला माहित, मी भारतात जन्मलो असतो तर कदाचित राष्ट्रीय संघाकडून खेळू शकलो नसतो. भारतीय संघात सामील होणं खूपच आव्हानात्मक आहे. त्यासाठी तुम्हाला विशेष खेळाडू असावं लागेल, असे डेविलियर्स म्हणाले.

२००८ पासून खेळतोय आयपीएल

एबी डेविलियर्सने आतापर्यंत १८४ आयपीएल सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३९.७० च्या सरासरीने ५१६२ धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरनंतर सर्वाधिक धावा करणारा डेविलियर्स हा दुसरा परदेशी क्रिकेटपटू आहे. डेविलियर्स आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून म्हणजेच २००८ पासून आयपीएलमध्ये बंगळूरू रॉयल चॅलेंजर्समध्ये (आरसीबी) खेळत आहे. यंदा आरसीबीने त्याला रिलीज केले. पुढील हंगामात डेविलियर्स नव्या संघाकडून खेळताना दिसू शकतो. सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या पाच खेळाडूंमध्ये डेविलियर्स एकमेव परदेशी क्रिकेटपटू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -