Monday, March 24, 2025
Homeताज्या घडामोडीमध्य रेल्वेकडून इगतपुरीत महिलेला बाळंतपणात मदत

मध्य रेल्वेकडून इगतपुरीत महिलेला बाळंतपणात मदत

मुंबई : प्रवासात गर्भवती महिलांसह अनेक गरजू रुग्णांसाठी रेल्वे नेहमीच सक्रिय भूमिका बजावते. आजच्या एका घटनेत प्रियांका शर्मा नामक गरोदर महिला लोकमान्य टिळक टर्मिनस ते फुलपूर (प्रयागराज जवळ) 11071 कामायनी एक्स्प्रेसच्या शयनयान श्रेणीमधून प्रवास करत असताना दि. ८.२.२०२२ रोजी साधारण १६.३० वाजता ट्रेन कसारा आणि इगतपुरी दरम्यान होती. तेव्हा तिला प्रसूती वेदना झाल्या. ऑन-बोर्ड टीसी कर्मचाऱ्यांनी ताबडतोब याबाबत आनंद शिंदे, उप स्टेशन व्यवस्थापक (वाणिज्य), इगतपुरी यांना माहिती दिली. संदेश मिळाल्यावर शिंदे यांनी इगतपुरी स्टेशनवर महिला डॉक्टर आणि महिला आरपीएफ कॉन्स्टेबल सविता यांची S/9 कोचच्या बर्थ क्र ६वर येण्याची व्यवस्था केली.

डॉ. ज्योत्स्ना, अतिरिक्त विभागीय वैद्यकीय अधिकारी आणि टीम उपस्थित झाले व रुग्णाला तपासून इगतपुरी येथे थांबण्याचा सल्ला दिला. तथापि, प्रसूती वेदना असलेल्या प्रियांका या महिलेने रेल्वे वैद्यकीय पथकाच्या मदतीने १७.१५ वाजता स्थानकाच्याच प्रतिक्षालयात एका निरोगी बाळाला जन्म दिला. नवजात व महिलेला प्रसूतीपश्चात उपचारासाठी रुग्णवाहिकेद्वारे इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. बाळ आणि बाळंतीण सुखरुप आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -