Friday, May 9, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

'काळे धंदे समोर येतील म्हणून राऊत घाबरले'

'काळे धंदे समोर येतील म्हणून राऊत घाबरले'


मुंबई : संजय राऊत हे कालपर्यंत नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपच्या अगदी लहान कार्यकर्त्यावरही टीका करत होते. मग आता 'ईडीच्या' चौकशीची वेळ आल्यावर संजय राऊत कशाला घाबरत आहेत?, असा सवाल भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला. 'ईडी'च्या कारवाईमुळे सगळे काळे धंदे समोर येतील म्हणून संजय राऊत खूप घाबरले आहेत. पण कर नाही त्याला डर कशाला? त्यामुळे संजय राऊत यांनी ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊन सर्व खुलासा करावा. यापूर्वी ईडीने त्यांच्या पत्नीचीही चौकशी केली होती. त्यामध्ये काही निष्पन्न झाले नव्हते. एरवीही संजय राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊ, असे सातत्याने बोलत असतात. मग आताच काय झाले, असा प्रश्न अतुल भातखळकर यांनी विचारला. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


तसेच संजय राऊत यांना केंद्रीय तपासयंत्रणा चुकीच्या वाटत असतील तर त्यांनी न्यायालयात जाऊन दाद मागावी. पण बेलगाम आरोप करु नयेत. परंतु, न्यायालयात गेल्यानंतर संजय राऊतांचे सगळे काळे धंदे दोन मिनिटांत समोर येतील. त्यामुळे संजय राऊत यांनी फुशारक्या मारु नयेत. जे असेल ते न्यायालयात जाऊन सांगावे. संजय राऊत यांनी आपणहून आपल्या कृत्यांची माहिती ईडीला द्यावी. मग इतरांना त्यांचे धंदे उघडकीस आणण्याची वेळ येणार नाही, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले. तसेच स्वत:वर कारवाई होते तेव्हा प्रत्येकालाच आणीबाणी वाटते, असेही भातखळकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment