
मुंबई : संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रविण राऊत यांच्यावर ईडीची कारवाई सुरु आहे. पुणे प्रकरणातही नातेवाईक आणि मित्रांवर कारवाई होणार आहे. त्यात अडकणार असल्याने संजय राऊत टेन्शनमध्ये आलेले दिसत आहेत. त्यामुळेच पुण्यात माझ्यावर हल्ला करण्यात आला, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.
संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत सौदेबाजी केली : सुधीर मुनगंटीवार
संजय राऊत यांना जनता गांभीर्याने घेत नाही. ते राज्यसभेसारख्या पवित्र सभागृहाचे सदस्य आहेत. राज्यसभेच्या सदस्याने मर्यादा आणि उंचीचे उल्लंघन कसे करु नये, याचे संजय राऊत हे मूर्तीमंत उदाहरण आहे. आम्ही जेलमध्ये गेलो तर तुम्हीही जेलमध्ये जाल, ही धमकी आहे. संजय राऊत यांची आजची पत्रकार परिषद म्हणजे सौदेबाजीचा प्रकार होता. आम्हीही तुमच्यावर कारवाई करणार नाही आणि तुम्ही आमच्यावर कारवाई करु नका, असे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.