नवी दिल्ली : देशातील प्राणघातक कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. गेल्या २४ तासांत देशात ७१ हजार ३६५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर १२१७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
देशातील दैनिक सकारात्मकता दर आता ४.५४ टक्के आहे. देशात आतापर्यंत ४ कोटी २४ लाख १० हजार ९७६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
दरम्यान, राज्यात मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रसार सुरू आहे. या कालावधीत कोरोनाच्या तीन लाटा आल्या. यापैकी दुसऱ्या लाटेत रोजची रुग्णसंख्या ११ हजारावर पोहोचली होती. या दरम्यान दिवसाला सर्वाधिक १६०० मॅट्रिक टन ऑक्सिजन लागला, तर तिसऱ्या लाटेत रोजची रुग्णसंख्या २० हजारांवर पोहोचली.
मात्र यादरम्यान सर्वात कमी ३०० ते ४०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागली. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत कमी प्रमाणात ऑक्सिजन लागत होता, आता ही मागणी घटली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.