Sunday, March 23, 2025
Homeदेशपंतप्रधान मोदी यांची राज्यसभेत काँग्रेसवर सडकून टीका

पंतप्रधान मोदी यांची राज्यसभेत काँग्रेसवर सडकून टीका

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर बोलताना काँग्रेसवर सडकून टीका केली. काँग्रेस नसती तर देशाचे काय झाले असते, असे येथे वारंवार बोलले गेले. मात्र महात्मा गांधींच्या सूचनेप्रमाणे काँग्रेस विसर्जित झाली असती तर खूप काही झाले नसते, असे ठणकावून सांगत मोदींनी काँग्रेसवर चौफेर बोचरी टीका करत काँग्रेसने केलेल्या चुकांचा पाढा मोदी यांनी भाषणात वाचला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “काँग्रेस जर नसती तर ही लोकशाही घराणेशाही पासून मुक्त राहिली असती. हा देश विदेशी ऐवजी स्वदेशीच्या संकल्पावर चालला असता, आणीबाणीचा कलंक लागला नसता, देशात जातीयवाद राहिला नसता, शिख लोकांचे हत्याकांड झाले नसते, तिथे दहशतवाद नसता, काँग्रेस जर नसती तर पंडितांना काश्मिर सोडावे लागले नसते. काँग्रेस जर नसती तर सर्वसामान्य माणसांना मुलभूत सोईसुविधांसाठी वाट पहावी लागली नसती”, अशी टीका मोदी यांनी केली.

काँग्रेसने कधी घराणेशाहीच्या पुढे कधी विचार केला नाही. देशाला सर्वात मोठा धोका हा घराणेशाही असलेल्या पक्षांपासून आहे. पक्षात जेव्हा एक कुटुंब प्रभावशाली बनते तेव्हा सर्वात पहिलं गुणवत्तेला लक्ष्य केलं जातं. सर्व पक्षांनी त्यांच्या त्यांच्या पक्षात लोकशाही अंमलात आणली पाहिजे, काँग्रेसने याचा सर्वात आधी याचा विचार केला पाहिजे अशी घणाघाती टीका मोदी यांनी काँग्रेसवर केली.

“मी गुजरातमध्ये मुख्यमंत्री होतो तेव्हा माझ्यावर किती अन्याय झाला, गुजरातवर पण केला झाला. गुजरातमध्ये मी नेहमी म्हणायचो देशाच्या विकासासाठी गुजरातचा विकास करा. काँग्रेस तर याआधी साध्या साध्या गोष्टींमुळे मुख्यमंत्र्यांना हटवत होते. काँग्रेसने आत्तापर्यंत जवळपास १०० वेळा निवडुन आलेल्या विविध राज्य सरकारला फेकून दिलं होतं, तेव्हा तुम्ही कोणत्या तोंडाने लोकशाहीबद्दल बोलत आहेत. एका पंतप्रधानांनी ५० राज्य सरकारला फेकून दिलं आहे. याचे उत्तर जनतेला द्यावे लागेल. आज त्यांची ते शिक्षा ते भोगत आहेत. काँग्रेसच्या सत्तेच्या नशेमुळे आज तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये कटुता आली आहे”, अशी टीका मोदी यांनी काँग्रेसवर केली.

काँग्रेस काळात बरखास्त करण्यात आलेल्या राज्यांची यादीच मोदींनी वाचून दाखवली. केरळमध्ये नंबुद्रीपाद यांचं सरकार बरखास्त केलं गेलं. तामिळनाडूतील करुणानिधींचं सरकार पाडलं. आंध्र प्रदेशमधलं एनटीआर सरकार बरखास्त केलं. कर्नाटकातलं बोम्मई यांचं सरकार पाडलं. विमानतळावर स्वागत व्यवस्थित झालं नाही, म्हणून त्याकाळी मुख्यमंत्री बदलले जात होते, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर तोफ डागली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -