Monday, July 15, 2024
Homeमहत्वाची बातमीमहाभारतातील भीम, प्रवीण कुमार यांचे निधन

महाभारतातील भीम, प्रवीण कुमार यांचे निधन

मुंबई : महाभारत मालिकेत भीम ही भूमिका साकारणारे अभिनेते प्रवीण कुमार सोबती यांचे निधन झाले आहे. मृत्यू समयी त्यांचे वय ७४ होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजाराशी झुंज देत होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. महाभारत मालिकेत त्यांनी साकारलेल्या भीम या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.

प्रवीण कुमार सोबती यांनी चित्रपटांमध्येही काम केले आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘शहेनशाह’ या चित्रपटात त्यांनी मुख्तार सिंग ही भूमिका साकारली होती. तसेच त्यांनी ‘करिश्मा कुदरत का’, ‘युद्ध’, ‘जबर्द’, ‘खुदगर्ज’, ‘लोहा’, ‘मोहब्बत के दुश्मन’, ‘इलाका’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे.प्रवीण कुमार हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ऍथलिट देखील होते. त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्यपदक पटकावले होते. तसेच त्यांनी 2 वेळा ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -