मुंबई : पुणे महापालिकेत भाजपा नेते किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडून झालेल्या धक्काबुक्कीनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून आता कारवाईची मागणी केली जात आहे. दरम्यान किरीट सोमय्या यांनाही रुग्णलायातून डिस्चार्ज मिळाला असून त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत किरीट सोमय्या यांनी हात पाय तोडण्याचे आदेश होते असा गंभीर आरोप केला आहे.
“शारिरीक इजा फार झालेली नाही. पण उद्धव ठाकरे आणि शिवसेना अशाप्रकारे कट कारस्थान करतं. अमिताभ गुप्ता हे तेच पोलीस आयुक्त आहेत ज्यांनी राकेश वाधवानला पळवून लावलं होतं. सगळे व्हिडीओ पाहिल्यानंतर आणि सीआयएसएफच्या अहवालतही पुणे पोलीस, महापालिकेतील सुरक्षा कर्मचारी आणि शिवसेना हायकमांडने मिळून रितसर कट रचला असल्याचं समोर आलं आहे. किरीट सोमय्या दोन, तीन महिने उठला नाही पाहिजे असा मार देण्याचा कट होता,” असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
“उद्धव ठाकरे गेल्या १५ दिवसांत प्रचंड अस्वस्थ आहेत. कारण संजय राऊतांच्या निकटवर्तीयांचे सगळे पुरावे सापडले आहेत. अनिल परब यांच्यावर तर कारवाईच सुरु झाली आहे. संजय राऊत. अनिल परब, ठाकरे परिवार आणि रश्मी ठाकरेंच्या भावाचा सहभाग सापडला आहे. त्यांनी ठरवून हे केलं,” असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
“किरीट सोमय्यांचे हात पाय तोडा, दोन-चार महिने उठले नाही पाहिजेत असा आदेश होता. हीच सूचना पोलीस आयुक्त आणि शहराध्यक्षांनाही दिली होती,” असंही ते म्हणाले आहेत.
“स्थानिक पोलीस नाही तर मुख्यमंत्री कार्यालय यामागे होतं. मुख्यमंत्री कार्यालयातून संजय राऊत, अनिल परब आणि पाटणकर या तिघांना वाचवण्यासाठी किरीट सोमय्याला दोन चार महिने शांत करण्याचा कट होता. किती मोठे दगड हातात होते. शनिवारी सुटु्टी होती. एक कर्मचारी कामावर नव्हता. मग हे १०० लोक आत कसे घुसले? शिवसेनेचे कार्यकर्ते हातात काठ्या दगड घेऊन कसे पोहोचले? झेड सेक्युरिटी असणाऱ्या व्यक्तीसाठी पोलिसांनी आधी जाऊन पाहणी करायची असते. त्यांनी हिरवा कंदील दिल्यानंतरच सीआयएसएफ कमांडो आत जाता. हे सर्व त्यांनी मिळून केलं,” असाही आरोप सोमय्यांनी केला.
“१०० लोक आत कसे गेले? आत गेल्यानतंर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आम्हाला गेटवर सांगितलं का नाही. बिल्डिंगच्या आत सगळे लपले होते. उद्धव ठाकरे इतके घाबरले की आता मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात खून, हत्या घडवत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला लाज वाटत आहे,” असं सोमय्या म्हणाले.
दरम्यान किरीट सोमय्या यांनी ट्वीटही केलं असून आपली हत्या करण्याचा हेतू होता असा आरोप केला आहे. सोबत त्यांनी एक व्हिडीओही जोडला आहे ज्यामध्ये एका व्यक्तीच्या हातात मोठा दगड दिसत आहे.
“मी पालिका आणि पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. गृहसचिवांना पत्र लिहिलं आहे. राज्यपालांची भेट घेणार आहे, कारवाईची मागणी करणार आहे. स्थानिक पोलीस अधिकारी, पालिकेचा सुरक्षा प्रमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. मुख्यमंत्री कार्यालयाने जाब दिला पाहिजे,” असंही ते म्हणालेत.
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार हाय अलर्ट मोडवर आहे. सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ जणांची हत्या केली. नाव आणि धर्म विचारुन…
महिलांना किंवा मुलींना ब्लाऊजचे नवीन नवीन पॅटर्न शिवण्याची खूप आवड असते. कोणत्याही समारंभात साडी नवीन…
मुंबई : वांद्रे येथे लिंकिंग रोडवरील लिंक स्क्वेअर मॉलमध्ये असलेल्या क्रोमा शो रूमला आग लागली.…
नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचेंद्र कुमार निवृत्त होत आहेत. यामुळे भारताच्या नॉर्दन आर्मी…
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांची मागणी मुंबई : किनारपट्टीवर राहत असलेल्या मच्छीमार समाजावर…