नवी दिल्ली – भारतात कोरोना रुग्णांची घटती संख्या दिलासा देणारी आहे. काल दिवसभरात देशात १ लाखांहून कमी कोरोना रुग्ण सापडले. गेल्या २४ तासात देशात ८३ हजार ८७६ नवे रुग्ण आढळले. तर ८९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
एका बाजुला नव्या रुग्णांची संख्या घटत आहे तर दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सक्रीय रुग्णांची संख्याही कमी होत चालली आहे. सध्या देशात ११ लाख ८ हजार ९३८ सक्रीय रुग्ण आहेत.
देशातील मृतांची संख्या दोन दिवसांपूर्वीच ५ लाखांच्यावर गेली आहे. आतापर्यंत ५ लाख २ हजार ८७४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा ७.२५ टक्क्यांवर पोहोचला आहे.