
मुंबई : शिवाजी पार्कवर लता मंगेशकर यांचे स्मृतिस्थळ उभारण्यात यावे अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे.
भारतरत्न दिवंगत स्वर्गीय लता दीदी यांच्यावर शासकीय इतमामात शिवाजी पार्क दादर, मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे, त्याच जागी शिवाजी पार्कवर गानकोकिळा भारतरत्न स्वर्गीय लतादीदी यांचे स्मृतीस्थळ उभारून त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी जतन कराव्यात. कोट्यवधी संगीतप्रेमी व लतादीदींचाच्या चाहत्यांच्यावतीने मी ही विनंती करत असल्याचे राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
https://twitter.com/ramkadam/status/1490534673923018755
संगीतप्रेमी आणि चाहत्यांच्या विनंतीचा, भावनेचा सन्मान करावा. त्याच ठिकाणी जगाला प्रेरणा देणारे स्मृतीस्थळ बनवावे, अशी मागणी राम कदम यांनी पत्राद्वारे केली आहे.