मुंबई : गान कोकिळा लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. गेल्या ८ जानेवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँड रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
मध्यंतरी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती, त्यानंतर त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आले होते. परंतु, पुन्हा एकदा त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.