
मुंबई (प्रतिनिधी) : शनिवारी दुपारी मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात रिलायन्स जिओचे नेटवर्क ठप्प झाले होते. दुपारी सव्वा बारा वाजल्यापासून जिओचे नेटवर्क बंद असल्याने जिओच्या ग्राहकांची प्रचंड गैरसोय झाली. काही तांत्रिक अडचणींमुळे सेवा बंद झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
कंपनीला काही तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागल्यामुळे मुंबई, नवी मुंबई, आणि ठाणे या परिसरामध्ये जिओचे नेटवर्क सायंकाळपर्यंत ठप्प झाले होते. यामुळे जिओ ग्राहकांची गैरसोय झाली होती.