Friday, May 9, 2025

देशमहत्वाची बातमी

देशात २४ तासांत १,२७,९५२ कोरोनाबाधित; १ हजारांहून अधिक मृत्यू

देशात २४ तासांत १,२७,९५२ कोरोनाबाधित; १ हजारांहून अधिक मृत्यू

नवी दिल्ली : देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. असे असले तरी देखील अद्यापही नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. तसेच, दैनंदिन मृत्यू संख्येत देखील अद्याप घट झाल्याचे दिसत नाही. दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणावर रूग्ण कोरोनामधून बरे होताना दिसत असल्याने, ही बाब काहीशी दिलासादायक आहे.


देशभरात मागील २४ तासांमध्ये १ लाख २७ हजार ९५२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, १ हजार ५९ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याशिवाय २ लाख ३० हजार ८१४ रूग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत.


https://twitter.com/ANI/status/1489809036362993664?ref_src
Comments
Add Comment