Tuesday, October 8, 2024
Homeताज्या घडामोडीसंजय राऊतांचा नातेवाईक आणि मित्रांना हाताशी धरुन १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर...

संजय राऊतांचा नातेवाईक आणि मित्रांना हाताशी धरुन १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा

किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप!

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांच्या मित्रपरिवाराने मुंबईतील कोव्हिड सेंटर्सच्या माध्यमातून १०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याची ‘ईडी’कडून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली. सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी स्थापन करुन पुणे आणि मुंबईतील कोव्हिड सेंटर्समध्ये कंत्राट मिळवले होते.

संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि भागीदार सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी निर्माण करून, मुंबईतील कोविड सेंटर्सचं कंत्राट मिळवले. असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. दहिसर, वरळी, महालक्ष्मी रेसकोर्स आणि मुलंड येथील कोविड सेंटर्सचे कंत्राट संजय राऊत यांचे भागीदार असलेले सुजीत पाटकर यांनी मिळवले असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. तसेच, या प्रकरणी ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे.

“संजय राऊत यांचे भागीदार सुजीत पाटकर यांनी आता १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला आहे. मुंबईत लाईफलाइन हेल्थ केअर जी कंपनी अस्तित्वात नाही, पेपर कंपनी. त्याला महालक्ष्मी रेसकोर्स, वरळी NSCI, मुलुंड, दहिसर आणि पुणे येथील कोविड सेंटर्सचे कंत्राट ठाकरे सरकारने दिले. या ठिकाणी अनेक कोरोनाबाधित रूग्णांचे मृत्यू झाले. या घोटाळ्यात ८० कोटी रुपये महापालिकेने पेमेंट केले, २० कोटींचे दुसरे करत आहे. या संदर्भात नॅशनल डिझायस्टर मॅनेजमेंट ऑथरिटीचे चेअरमन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मी तक्रार केलेली आहे. या घोटाळ्याची चौकशी व्हायला हवी.” असे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले.

याचबरोबर, “आज दुपारी ४ वाजता मी पुण्यातील जम्बो कोविड सेंटर घोटाळ्यासाठी संजय राऊत यांचे भागीदार सुजीत पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध शिवाजी नगर पुणे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहे. खोटे डॉक्युमेंट्स देवून कॉन्ट्रॅक्ट मिळविला. कोविड रुग्णांचा मृत्यू झाला, गुन्हा दाखल झाला पाहिजे.” अशी माहिती देखील किरीट सोमय्या यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -