पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे निर्व्यसनी, बंडातात्यांनी मागितली माफी

  78

सातारा : पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे या दारु पितात, असे वादग्रस्त विधान बंडातात्या कराडकर यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचे राज्यभर पडसाद उमटले. राज्यात अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात निदर्शने झाली. मात्र, आता बंडातात्यांनी जाहीर माफी मागितली आहे.


मीडियासमोर येऊन बंडातात्यांनी आपले विधान मागे घेतले आणि पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांची माफी मागितली. तसेच, पंकजा मुंडे आणि सुप्रियाताई या निर्व्यसनी, सदाचारी आहेत, असे बंडातात्या म्हणाले. सुप्रियाताई आणि पंकजाताई यांच्याबद्दल मी आकसाने बोललो नाही. काही ऐकीव माहितीच्या आधारे मी ते विधान केले. माझ्या मनात त्यांच्याविरोधात काहीच मत नाही. त्या दोघींना भेटून दिलगीरी व्यक्त करणार आहे, असे बंडातात्या म्हणाले.


ते पुढे म्हणाले की, सुप्रिया आणि पंकजा यांना मी कन्येच्या ठिकाणी मानतो. त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला असेल तरी या दोन्ही माझ्या मुली समजून बाप या नात्याने मी क्षमा मागतो. माफी मागण्यात मला कोणताही कमीपणा वाटत नाही. मी त्यांना विनंती करेल की तुमच्या अनुयायांच्या भावनांचा उद्रेक होऊ नये याची त्यांनी दक्षता घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली. तसेच, राजकीय नेत्यांची माफी मागितल्याने माझं अध्यात्मिक आणि नैतिक वजन वाढलंच आहे, असंही ते म्हणाले.

Comments
Add Comment

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला

Amravati News : भयानक...अमरावतीत १३ फूट लांबीच्या अजगराने घेतला बकरीचा जीव

अमरावती : तालुक्यातील सुरवाडी खुर्द शेत शिवार परिसरात एका १३ फूट लांबीच्या अजगराने २० किलो वजनाची बकरी

चोरांनी मोबाईल टॉवर्सनाही सोडले नाही! लातूरमध्ये नेटवर्क मशीन्स चोरल्याप्रकरणी तिघांना अटक

लातूर: चोर काय चोरतील काही सांगता येत नाही, साखळी चोर, मोबाइल चोरपासून तर बरेच आहेत पण लातूर जिल्ह्यामधील