Thursday, October 30, 2025
Happy Diwali

नीट-पीजी परीक्षा पुन्हा पुढे ढकलली

नीट-पीजी परीक्षा पुन्हा पुढे ढकलली

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय प्रवेश परिक्षांसाठी अनिवार्य असलेली नीट-पीजी परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी १२ मार्च रोजी होणारी राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा (नीट-पीजी) पुढे ढकलण्याची मागणी एमबीबीएसच्या ६ विद्यार्थ्यांनी केली होती. यासंबंधी दाखल केलेल्या याचिकेवर आज, शुक्रवारी झालेल्या सुनावणीनंतर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटनुसार, नीट-पीजी २०२२ पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका २५ जानेवारी रोजी दाखल करण्यात आली होती. त्यावर आगामी ७ फेब्रुवारी रोजी सुनावणी अपेक्षित होती. परंतु, तत्पूर्वी ही याचिका न्या. चंद्रचूड आणि न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणीला आली. यावेळी ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

राष्ट्रीय परीक्षा मंडळाने ‘नीट पीजी 2022’ची परीक्षा 12 मार्च रोजी घेण्याचे ठरविले आहे. मात्र राज्यात सध्या पदव्युत्तर पदवर वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया यंदा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि अन्य कारणांमुळे उशीरा सुरू झाली. त्यामुळे 12 मार्च रोजी नीट पीजी 2022 ची परीक्षा झाल्यास राज्यातील 150 विद्यार्थ्यांची संधी हुकण्याची शक्यता आहे. शिवाय सर्वाधिक केरळमधील 3600 विद्यार्थ्यांची इंटर्नशिप ऑगस्ट महिन्यात संपणार आहे. गुजरातमधील 300 विद्यार्थ्यांची इंटर्नशिप जुलै महिन्यात संपणार आहे. हाच मुद्दा अन्य राज्यातील विद्यार्थ्यांचाही आहे.

Comments
Add Comment