जया बच्चन यांना कोरोनाची लागण

  90

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. करण जोहरचा आगामी चित्रपट ''रॉकी और रानी की प्रेम कहानी'' मध्ये जया बच्चन झळकणार आहेत. मात्र, त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे.


याच चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शबाना आझमी यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. आता जया बच्चन यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर करण जोहरने चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.


करणने गेल्या वर्षी ''रॉकी और रानी की प्रेम कहानी'' या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात रणवीर, आलिया, शबाना आणि जया बच्चन यांच्याशिवाय धर्मेंद्र देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता