मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. करण जोहरचा आगामी चित्रपट ”रॉकी और रानी की प्रेम कहानी” मध्ये जया बच्चन झळकणार आहेत. मात्र, त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे.
याच चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शबाना आझमी यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. आता जया बच्चन यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर करण जोहरने चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
करणने गेल्या वर्षी ”रॉकी और रानी की प्रेम कहानी” या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात रणवीर, आलिया, शबाना आणि जया बच्चन यांच्याशिवाय धर्मेंद्र देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.