Friday, May 9, 2025

देशमहत्वाची बातमी

ओवेसींना सीआरपीएफची झेड श्रेणीची सुरक्षा

नवी दिल्ली : ‘एमआयएम’ पक्षाचे प्रमुख आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर उत्तर हापूर येथून दिल्लीला जाताना हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सायंकाळी अज्ञान व्यक्तींनी हल्ला केला. या प्रकरणी सचिन आणि शुभम अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. तर, या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता भारत सरकारने त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे. ओवेसी यांना सीआरपीएफची झेड श्रेणीची सुरक्षा तत्काळ प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


या हल्ल्यानंतर ओवेसी यांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला असून, माझी सुरक्षा सरकराची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. ‘१९९४ मध्ये मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. आतापर्यंत मी कोणतीही सुरक्षा घेतली नाही. मला हे आवडतही नाही. माझी सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे. मी भविष्यातही सुरक्षा घेणार नाही. जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा मी जाईन”, असे ओवेसी म्हणाले होते.

Comments
Add Comment