Friday, October 4, 2024
Homeदेशदेशातली रुग्णसंख्या पुन्हा वाढली; नवबाधितांची संख्या दीड लाखाच्या वर

देशातली रुग्णसंख्या पुन्हा वाढली; नवबाधितांची संख्या दीड लाखाच्या वर

नवी दिल्ली : देशातल्या कोरोना रुग्णसंख्येत काल दिवसभरात पुन्हा वाढ नोंदवण्यात आली. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी दैनंदिन नव्या कोरोनाबाधितांची संख्या ६.८ टक्क्यांनी वाढली आहे. मात्र दिलासादायक गोष्ट अशी की आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या दोन लाखांपेक्षा कमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. त्यासोबतच उपचाराधीन रुग्णसंख्याही एक लाखांच्या खाली आहे. मात्र केरळमधली रुग्णसंख्या चिंताजनक आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत केरळ संसर्गाचा केंद्रबिंदू ठरला आहे. तिथे रुग्णसंख्येत फारशी घट दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून केरळमधली रुग्णसंख्या ५० हजारांच्या वरच आहे. काल दिवसभरात केरळमध्ये कोरोनाच्या नव्या ५२ हजार १९९ रुग्णांची नोंद झाली. तर २९ रुग्णांचा मृत्यू झाला. केरळसोबतच महाराष्ट्रातही कोरोना रुग्णसंख्येत वाढ नोंदवली गेली आहे. काल दिवसभरात राज्यात १८ हजार ६७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ७९ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत काल दिवसभरात १ हजार १२१ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -