पणजी : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या निधनावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी तीव्र शोक व्यक्त केला.
ट्वीटरद्वारे रमेश देव यांच्यासोबत असलेल्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त करीत फडणवीस म्हणाले, ” ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. सुमारे तीन पिढ्यांनी त्यांच्या अभिनयाचा आस्वाद घेतला.
मराठी आणि हिंदी मिळून 500 चित्रपट त्यांनी साकारले.नाटकांमधून त्यांनी मराठी नाट्य विश्व समृद्ध केले, अमूल्य योगदान दिले. जितके चांगले कलावंत, तितकेच चांगले व्यक्तिमत्त्व सुद्धा.मालिका, जाहिरात विश्व सुद्धा त्यांनी गाजवले. मराठी सिनेसृष्टीने एक मोठा आधारस्तंभ गमावला आहे.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. ॐ शांती.”