Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीअभिनेता अमिताभचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

अभिनेता अमिताभचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ दयाल यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या १३ दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान २ फेब्रुवारी २०२२ रोजी पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी त्यांचे निधन झाले.

दिवंगत अभिनेता ओम पुरी यांच्यासोबत ‘कागर: लाइफ ऑन द एज’ चित्रपटात काम केले होते. याशिवाय अमिताभ यांनी रंगदारी (२०१२) आणि धूम (२०१३) या चित्रपटांमध्येही काम केले होते.

२००० मध्ये अमिताभने मराठी दिग्दर्शक मृणालिनी पाटील यांच्याशी लग्न केले होते. मात्र, लग्नाच्या नऊ वर्षानंतर दोघेही वेगळे झाले. त्यांना शिवम आणि अमृता हे दोन मुले आहेत.

https://www.instagram.com/p/CZTdkktKFSC/

अमिताभ दयाल यांनी ‘विरुद्ध’ आणि ‘कागर’ सारख्या चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच पत्नी मृणालिनी पाटील दिग्दर्शित धूम (२००१३), रंगदारी (२०१२), ये दिल्लगी (२०१३) यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले होते.

अमिताभ दयाल यांचा जन्म बिलासपूर, छत्तीसगड येथे झाला. मृणालिनी पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ दयाल यांचे काही नातेवाईक छत्तीसगडहून येणार आहेत. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -