Wednesday, July 2, 2025

देशात २४ तासांत १,७३३ मृत्यू; १,६१,३८६ नवे कोरोनाबाधित

देशात २४ तासांत १,७३३ मृत्यू; १,६१,३८६ नवे कोरोनाबाधित

नवी दिल्ली : देशात करोना संसर्गाचे प्रमाण आता काहीसे कमी-कमी होत असले, तरी देखील कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येत दररोज वाढ सुरूच असल्याचे दिसत आहे. मागील २४ तासांत देशभरात १ लाख ६१ हजार ३८६ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, १ हजार ७३३ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यामुळे देशात आजपर्यंत मृत्यू झालेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४,९७,९७५ झाली आहे.


देशात मागील २४ तासांमध्ये २ लाख ८१ हजार १०९ रूग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. सध्या देशातील अॅक्टीव्ह केसेसची संख्या १६,२१,६०३ आहे. तर आजपर्यंत ३,९५,११,३०७ जण कोरोनातून बरे झाले आहेत. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट ९.२६ टक्के आहे.


https://twitter.com/ANI/status/1488720661501849601?ref

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचे 164.89 कोटीहून अधिक डोस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्या लसीचे 11.48 कोटी पेक्षा जास्त डोस आहेत. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसींचे 167 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. मंगळवारी दिवसभरात 57 लाख 42 हजार 659 लसींचे डोस देण्यात आले. तर, आतापर्यंत 167 कोटी 29 लाख 42 हजार 707 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, लसीचे 164.89 कोटीहून अधिक डोस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्या लसीचे 11.48 कोटी पेक्षा जास्त डोस उपलब्ध आहेत.

Comments
Add Comment