नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आपला चौथा अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन यांनी देशातील पायाभूत सुविधांसाठी यावेळी विविध घोषणा केल्या. यंदाच्या बजेटमध्ये सर्वसामान्यांना काय मिळाले, काय स्वस्त झाले आणि काय महागले हे खालीलप्रमाणे पाहता येईल.
स्वस्त होणार
- इलेक्ट्रॉनिक्स वस्तू
- मोबाईल फोन, चार्जर
- कपडे, चामड्याचा वस्तू
- हिऱ्याच्या वस्तू, दागिने
- शेतीची अवजारे
- कॅमेरा लेन्सेस
- विदेशातून येणाऱ्या मशिन्स
- चप्पल आणि बुट्स
- इम्पोर्टेड केमिकल
- इंधन स्वस्त होण्याची शक्यता
महागणार
- छत्र्या
- क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणूक