नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील चौथा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या लोकसभेत सादर करत आहेत. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री उपस्थित होते.
२०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन सांगितले की, डिजिटल अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. देशाचा विकास दर ९.२७ टक्के असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. इतक नाही तर पुढील पाच वर्षात ६० लाख नवे रोजगार निर्मिती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.