Tuesday, April 29, 2025

देशताज्या घडामोडी

केंद्रीय अर्थसंकल्प Budget 2022 : आयकरात कोणत्याही प्रकारचा बदल नाही

केंद्रीय अर्थसंकल्प Budget 2022 : आयकरात कोणत्याही प्रकारचा बदल नाही

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात महत्वाच्या घोषणा केल्या असून महिला, शेतकरी तसंच विद्यार्थ्यांचा उल्लेख केला आहे. मात्र आयकरात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नसल्याने सर्वसामान्यांची निराशा झाली आहे. सलग सहाव्या वर्षी कररचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

परंतु करचुकवेगिरी प्रकरणात छापा मारल्यास सर्व सपंत्ती जप्त करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

स्टार्टअपला केंद्राचं प्रोत्साहन

स्टार्टअपसाठी २०२३ पर्यंत करसवलत दिली जाईल असं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.

जानेवारी २०२२ मध्ये १ लाख ४० हजार ९८६ कोटीचं जीएसटी संकलन

जीएसटीच्या रचनेत अनेक बदल झाले असून एक कराचं स्वप्न पूर्ण झालं आहे. करोना काळ असूनही महसूल वाढताना दिसत आहे. जानेवारी २०२२ मध्ये १ लाख ४० हजार ९८६ कोटीचं जीएसटी संकलन झालं आहे. जे आतापर्यंतचं सर्वाधिक आहे. करोनाचा काळ असतानाही अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जन करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आल्यानेच हे शक्य झालं आहे असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

Comments
Add Comment