नवी दिल्ली : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेल्या यंदाच्या अर्थसंकल्पातून भारताचा पुढील २५ वर्षांचा पाया रचला जाईल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला. त्यांनी देशाच्या पुढील २५ वर्षाच्या अर्थव्यवस्थेचा पाया घालण्याचा प्रयत्न या बजेटमधून करण्यात आला आहे, असे नमूद केले.
“हा अर्थसंकल्प देशाच्या स्वातंत्र्याच्या १००व्या वर्षाची ब्लु प्रिंट आहे. स्वातंत्र्याच्या सध्याच्या ७५व्या वर्षापासून पुढील २५ वर्षाच्या अर्थव्यवस्थेचा पाया घालण्याचा प्रयत्न या बजेटमधून करण्यात आला आहे. पुढील आर्थिक वर्षात आर्थिक वाढ ९..२ टक्के राहण्याची अपेक्षा आहे. ही वाढ प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक आहे”, असेही त्यांनी सांगितले.