मुंबई : कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लावण्यात आलेली रात्रीची संचारबंदी हटवण्यात आल्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मुंबई महापालिकेने परिपत्रक काढले आहे.
मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने मुंबईतील निर्बंध आणखी शिथील करण्यात येत आहेत. मुंबईत काल केवळ एक हजार रुग्ण आढळून आल्याने मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.