मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई, नवी मुंबई, नाशिक, वसईमध्ये येणाऱ्या पालिका निवडणुकीची रणनीती आखली आहे. त्यानुसार सर्व पदाधिकारी, सरचिटणीस यांच्यासोबत राज ठाकरे करणार चर्चा आहेत. वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे मनसेची 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता बैठक होणार असून, या बैठकीत राज ठाकरे स्वतः राहणार उपस्थित असणार आहेत.
राज्यात लवकरच महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परीस्थितीमुळे निवडणुका लांबल्या होत्या. मात्र आता कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी होताना दिसत असल्यानं निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभुमिवर मनसेने तयारी सुरू केली असून, आगामी काळातील निवडणुकांसाठी मनसे जारदार तयारी करणार असल्याची चिन्ह दिसत आहे.
दरम्यान, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांसाठी राज्यात नवी राजकीय समीकरणं तयार होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यानुसार मनसे आणि भाजप एकत्र येणार का असा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे. भाजपने शिवसेनेची साथ सोडल्यापासून युतीमध्ये निर्माण झालेल्या पोकळीचा फायदा मनसे घेणार का हे पाहावं लागणार आहे.
राज ठाकरेंचे ‘मिशन महापालिका’, २ फेब्रुवारी रोजी पदाधिकाऱ्यांची बैठक