Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीदेशातील कोरोना रुग्णांमध्ये घट, गेल्या २४ तासात २,३५,५३२ रुग्ण, ८७१ जणांचा मृत्यू

देशातील कोरोना रुग्णांमध्ये घट, गेल्या २४ तासात २,३५,५३२ रुग्ण, ८७१ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात प्राणघातक कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 2 लाख 35 हजार 532 नवीन रुग्ण आढळले असून 871 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील दैनंदिन कोरोना सकारात्मकता दर आता 13.39 टक्क्यांवर आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कालपेक्षा आज कोरोनारुग्णांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळाली आहे. देशात कालच्या तुलनेत 15 हजार 677 रुग्ण कमी झाले आहेत. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 20 लाख 4 हजार 333 वर आली आहे. त्याचबरोबर या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 93 हजार 198 झाली आहे. आकडेवारीनुसार, काल तीन लाख 35 हजार 939 लोक बरे झाले, त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 83 लाख 60 हजार 710 रुग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत.

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 165 कोटींहून अधिक कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. शुक्रवारी दिवसभरात 56 लाख 72 हजार 766 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत 165 कोटी 4 लाख 87 हजार 260 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -