Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीडॉ. व्ही. अनंत नागेश्वरन देशाचे नवे मुख्य आर्थिक सल्लागार, स्वीकारला पदभार

डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन देशाचे नवे मुख्य आर्थिक सल्लागार, स्वीकारला पदभार

नवी दिल्ली : सरकारने देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी डॉ व्ही अनंत नागेश्वरन यांची नियुक्ती केली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे.

अर्थमंत्रालयाने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. डिसेंबर 2021 मध्ये के. व्ही. सुब्रमण्यम यांचा कार्यकाल संपला होता. त्यानंतर या पदावर कुणीचीही नियुक्ती करण्यात आली नव्हती. सुब्रमण्यम यांच्या राजीनाम्यानंतर या पदावर कुणाचीच नेमणूक केली नव्हती. आता ही जबाबदारी डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांना देण्यात आली आहे.

31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. तत्पुर्वी केंद्र सरकारने नवीन मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून के. व्ही. सुब्रमण्यम यांची नियुक्ती केली आहे.

डॉ नागेश्वरन यांनी यापूर्वी लेखक, शिक्षक आणि सल्लागार म्हणून कार्य केले आहे. त्यांनी भारत आणि सिंगापूर येथील अनेक व्यावसायिक संस्थांमध्ये शिकवले आहे. तसेच त्यांचे विपूल लेखन प्रकाशित आहे. ते आयएफएमआर ग्रॅज्यूएट स्कूल ऑफ बिजनेस येथे डिन म्हणून आणि क्रिया विद्यापीठ येथे अर्थशास्त्राचे अर्धवेळ प्राध्यापक असे काम पाहिले आहे. ते पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे 2019 ते 2021 या काळात अर्धवेळ सदस्य होते. डॉ नागेश्वरन यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अहमदाबाद येथून व्यवस्थापनात पदव्युत्तर पदविका प्राप्त केली आहे आणि अमहर्स्ट मॅसेचुसेट्स विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी पूर्ण केली आहे. डॉ. नागेश्वरन यांनी 1985 मध्ये अहमदाबादमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी एमबीए केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -