Thursday, July 25, 2024
Homeदेशदेशातील १५ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढीचा वेग अधिक, महाराष्ट्रातील 'या' दोन जिल्ह्यांचा...

देशातील १५ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढीचा वेग अधिक, महाराष्ट्रातील ‘या’ दोन जिल्ह्यांचा समावेश

नवी दिल्ली : देशात अद्यापही दोन लाखांच्या पुढे कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. शुक्रवारी देशात 2,51,209 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 627 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला होता. सध्या देशात कोरोना संक्रमणाचा दर हा 15.88 टक्के आहे. केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मागच्या सात दिवसांवमध्ये देशातील 15 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढीचा वेग मोठा आहे. या 15 जिल्ह्यांमध्ये सात जिल्हे हे दक्षिण भारतातील आहेत. महाराष्ट्रातील पुणे आणि नागपूर या दोन जिल्ह्यातही रुग्ण वाढीचा वेग अधिक असल्याचे चित्र दिसत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, केरळमधील जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त कोरोना रुग्ण वाढीचा वेग आहे. केरळमधील सहा जिल्ह्यांमध्ये रुग्ण वेगाने वाढत आहेत. त्याचबरोबर गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यातील प्रत्येकी दोन जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. तर कर्नाटक आणि राजस्थानमधील प्रत्येकी एका जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण वेगाने वाढत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

21 ते 27 जानेवारी यादरम्यान 15 जिल्ह्यातील रुग्णसंख्या

बंगळुरू शहर – 1,43,960

पुणे -75,592

एर्नाकुलम – 55,693

तपुरम – 46,570

अहमदाबाद – 44,666

चेन्नई – 30,218

नागपूर – 28,326

कोझीकोड – 27,229

थिरिसूर – 25,822

कोयंबटूर – 25,751

कोल्लम – 23,191

वडोदरा – 22,021

कोट्टायम – 20,730

गुरुग्राम – 19,727

जयपूर – 19,289

या 15 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढीचा वेग अधिक असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. मागच्या 24 तासामध्ये देशात 3,47,443 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. देशात सध्या कोरोना संक्रमणाचा दर हा 15.88 टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीत असे सांगण्यात आले की, देशात अशी 11 राज्ये आहेत जिथे सक्रिय रुग्ण संख्या जास्त आहे. ज्यांची संख्या 50 हजारांपेक्षा जास्त आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओडिशा ही राज्ये आहेत. कर्नाटकात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. त्याचबरोबर देशातील 551 जिल्ह्यांमध्ये संसर्ग दर हा 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -