Sunday, August 31, 2025

भय्यू महाराजांचे १२ तरुणींसोबत होते संबंध, यापैकी दोघी आयएएस अधिकारी

भय्यू महाराजांचे १२ तरुणींसोबत होते संबंध, यापैकी दोघी आयएएस अधिकारी

भोपाळ : भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणाला आता आणखी एक नवीन वळण मिळालं आहे. या प्रकरणी प्राथमिक तपासात घरगुती कारणामुळे आत्महत्या झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र त्यानंतर या प्रकरणाच्या अनेक बाजू समोर आल्या. आता या प्रकरणी आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शरद, विनायक आणि पलक हे तिघे मिळून भय्यू महाराज यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करीत होते. पोलिसांच्या तपासात हे देखील समोर आलं की, महाराजांचे १२ तरुणींसोबत संबंध होते, यातील २ तरुणी तर आयएएस आहे.

भय्यू महाराजांनी १२ जून २०१८ रोजी स्वत:ला गोळी घालून आत्महत्या केली होती. मात्र या प्रकरणात दोन महिन्यांपर्यंत पोलिसांना काहीच सुगावा लागत नव्हता. त्यामुळे फाइल बंद करण्याची तयारी सुरू झाली होती. मात्र एका फोनमुळे महाराजांच्या सुसाइडच्या सहा महिन्यानंतर विनायक, पलक आणि शरद यांनी अटक करण्यात आली आणि त्यांची या प्रकरणात चौकशी केली असता नवनविन स्फोटक माहिती उघडकीस येत आहे.

Comments
Add Comment