Friday, March 21, 2025
Homeताज्या घडामोडीकांदिवली स्थानकावरील सरकते जिने सुरू करण्याकरिता आ. अतुल भातखळकर यांचे आंदोलन

कांदिवली स्थानकावरील सरकते जिने सुरू करण्याकरिता आ. अतुल भातखळकर यांचे आंदोलन

मुंबई : कांदिवली पूर्व रेल्वे स्थानकावरील सरकते जिने सुरू करण्याकरिता मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबई महापालिके विरोधात धरणे आंदोलन केले. यावेळी त्यांनी मुंबई महापालिका प्रशासनाच्या कारभारावर कडाडून टीका केली.

गेल्या दोन वर्षांपासून कांदिवली पूर्व रेल्वे स्थानकावरील सरकते जिने बंद असल्याबाबत आ. भातखळकर यांनी पत्राद्वारे महापालिकेला कळविले होते. परिसरातील नागरिकांना विशेषतः ज्येष्ठ नागरिक व गरोदर स्त्रियांना पूर्वेकडून पश्चिमेला जाण्याकरिता त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे लवकरात लवकर सरकते जिने सुरू करण्याबाबत त्यांनी वारंवार महापालिकेला कळवून देखील पालिका प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने त्यांनी आज धरणे आंदोलन केले. यावेळी पालिका केवळ पेंग्विन पालनामध्ये व्यस्त असल्याने मुंबईकरांच्या इतर प्रश्नांची दखल घ्यायला वेळ नाही असे म्हणत आ. भातखळकर यांनी पालकमंत्र्यावर ही निशाणा साधला.

या आंदोलनात मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक व महिला तसेच कांदिवली विभागातील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक व कार्यकर्ते हे सहभागी झाले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -