विरार : विरार येथील साईनाथनगर परिसरात शिवसेना विभाग प्रमुखाला एका महिलेने चांगलाच चोप दिला आहे. शिवसेना विभागप्रमुखाचे नाव जितू खाडे असून त्याला रिक्षातच एका महिलेने चपलेने चोपले. फोन कॉलवरुन सेक्ससाठी महिलांची मागणी जितू खाडे करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे.
सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशलवर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पीडित महिला जितू खाडेला रिक्षातच आयटम चाहीये? तुझे, असे म्हणत चपलेने रिक्षातच मारायला सुरुवात करते आहे. पीडित महिलेने जितू खाडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. फोन कॉल करुन, सेक्ससाठी महिलांची मागणी जितू खाडे करत होता, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.
दरम्यान, महिलेने जितू खाडे विरोधात विरार पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हाही दाखल केला आहे. सध्या जितू खाडे फरार आहे. शिवसेनेचे पालघर उपजिल्हा प्रमुख दिलीप पिंपळे यांनी जितू खाडेच्या कृतीला आमचा पाठिंबा नसून, वरिष्ठांशी बोलून, त्याच्यावर लगेच कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.