इस्लामाबाद (हिं.स.) : बलुचिस्तान प्रांतातील केच जिल्ह्यात पाकिस्तानच्या सुरक्षा दलाच्या सैनिकांच्या तळावर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यांत १० पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला असून अनेक सैनिक जखमी झाले आहेत. तर एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सैनिकांना यश मिळाले आहे. पाकिस्तानी सैन्याकडून ही माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाच्या सैनिकांच्या तळावर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. यावेळी १० सैनिकांचा यात मृत्यू झाला. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून अनेक ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला आहे. अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही.